भीकेचे डोहाळे

कधी कधी असे वाटते;

१) शेतकऱ्यांच्या जमिनी भाड्यावर सरकारने घ्याव्या.

२) त्या शेतीत त्यालाच सरकारी नोकरी द्यावी.

3) शेतीला लागणार बियाण, अवजार, मजुराचा खर्च सरकारचा तसेच पिकावर सुद्धा सरकारचा हक्क राहील.

४) एक बेसिक पगार शेतकऱ्याला देण्यात यावा तसेच उत्कृष्ट पिक काढल्याबद्दल वेगळा बोनस द्यावा.

५) शेतकऱ्याला वय वर्षे साठ नंतर पेंशन चालु ठेवावी.

६) शेतकऱ्याच्या मुलानां शेतीचे शिक्षण मोफत द्यावे, त्यानां मोफत घरे द्यावी, मुलाच्या लग्नासाठी प्रत्येकी 2 लाख रुपये द्यावेत. यासाठी महिन्याला 2000/- कमी पगार दिला तरी चालेल.

७) सर्व आजारासाठी सरकारी किवां खाजगी रुग्णालयात मोफत उपचार द्यावेत.

८) जे शेतकरी जैविक खताचां वापर करतील त्यानां जास्त पगार द्यावा.

९) प्रत्येक शेतकऱ्याला दोन पेक्षा जास्त मुले नकोत. मुलीचें नावही समान हक्काने वडिलांनतंर 7/12 वर आले पाहिजे.

१०) शेतकऱ्याचा मुलगा किंवा मुलगी शेतकरीच असला पाहिजे.

#फायदे

१) जास्त पाऊस आला, नापिकी झाली तर नुकसान सरकारच. शेतकरी सुरक्षित. उत्पादन वाढले सरकारचा फायदा.

२) वीज, पाण्यासाठी शेतकर्याला चकरा माराव्या लागणार नाही. सरकारच सोय करेल.

३) सातबारा सदैव कोरा.

४) दरवर्षी कर्जमाफी, दौरे यांच्यावर होणारा खर्च वाचवता येईल.

५) सर्वात महत्वाच शेतकरी आत्महत्या संपूर्ण थांबतील. कारण नापिकी आली किंवा नुकसान झालं तर सरकारचं होईल. शेतकऱ्याच नाही.

*शेतकरी पुत्रांनो खरच या उपाय योजनेने प्रश्न सुटतील का? की शेतकरी राजा व्यावसायिकांचा चाकर होयील... अापनास वाटते का अापन अापल्या जमीनीचे मालक राहुन हे सरकार तुम्हाला या सुवीधा देयील शक्यच नाही सरकार ही जबाबदारी घेनारच नाही व दबावाखाली जबाबदारी घेतली तर त्याचेही टेंडर काडुन उद्योगपतींच्या घस्यात ही जमीन घालुन स्वत:च्या पाच पन्नास पीढ्यासाठी कमऊन ठेवतील व तुम्हाला तुम्ही मागत असलेल्या सुवीधांच गाजर दाखवून जमीनी नावावर करून घेतील अाज फास घ्यायला व अग्नी द्यायला तरी हक्काची जागा अाहे ती सुध्दा अापली राहनार नाही फक्त शेतीतील उत्पन्न  शास्वत राहीले नाही म्हणून शेतकरी पुत्र शहरात अाले तर येवढी बेकारी वाढली पगार कमी झाले कॉन्टरॅक्ट बेसीसवर नोकर्या चालु झाल्या हे बदल अास्याने अाजुन खालावतील व व्यावसायीकांची चाकरी ते म्हणतील त्या मोबदल्यावर करावी लागेल*
*वेगळा वीचार करा स्वत: उत्पादन केलेला शेतमाल स्वत:च्या यंत्रनेमार्फत वीका व्यापार्यांना मीळनारा नफा अापनच मीळवा मग पाहुया का शेती परवडत नाही ते काळानरूप बदला पन भीकेचे डोहाळे लागु देऊ नका चकचकीत शहरांच्या मोहापायी स्वतंत्र्य घालऊन बसु नका त्यांनी ते मिळवण्या साठी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात तो बदल केलाय म्हणूनच ते मोठ्या प्रमानावर नफा मीळवर अाहेत असाच जर बदल केला तर यापेक्षाही चकचकीत जीवन अापला शेतकरी पुत्र जगु शकतो म्हणूनच शेतकरी पुत्र समुह हा बदल घडवण्यास पुढाकार घेत अाहे त्यात सामील व्हा नाहीतर ज्याप्रमाने इग्रज व्यावसाय करण्यासाठी भारतात व्यापार करायला अाले व अापन पारतंत्र्यांत गेलो तसेच अाजही अापल्या मागनीवरून अपनही पारतंत्र्यात जाऊ मगच स्वातंत्र्याची कींमत कळेल कारन त्यावेळी व्यापार्यांना असेच डोहाळे लागले होते म्हणून देश १५० वर्षे पारतंत्र्यात गेला परंतु अाज जर शेतकरी या परतंत्र्यात गेला तर चाकर म्हणूनच १०००रो पाढ्या पारतंत्र्यात जातील जागे व्हा जबाबदारी घ्या उद्योजक व्हा शेतकरी पुत्र समुह नक्कीच अापनास मदत करेल*

*धन्यवाद...🙏*
*शेतकरी पुत्र - शरद बोराटे*
०९२२६७५२१०२ ०७७७६८८१५४९
*संस्थापक - शेतकरी पुत्र समुह महाराष्ट्र.*

Comments